Ads

--

खा. डेलकर आत्महत्याप्रकरणी लोकसभा अध्यक्षांनी लक्ष घालावे!

By Xtralarge News

March 10, 2021 5:52 pm

Ads

खा. डेलकर आत्महत्याप्रकरणी लोकसभा अध्यक्षांनी
लक्ष घालावे!

नवी दिल्ली, दि. १० मार्च :
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज विरोधी पक्षाच्या खासदारांसह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

सुप्रिया सुळे यांनी या निवेदनात खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि तेवढीच धक्कादायकही आहे. सातवेळा खासदारकी भूषवणारे मोहन डेलकर इतके निराश झाले होते, वैफल्यग्रस्त झाले होते की त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. आपण आपल्या सहकाऱ्याला गमावलं आहे. तुम्ही लोकसभेचे प्रमुख आहात. त्या नात्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जावी अशी मागणी केली.

भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी योग्य ते उपाय योजण्याची गरज आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यांनी सुचवले आहे.

 

No comments to show.

Leave a Comment