Ads

-

आदित्य ठाकरेंचा आढावा बैठकांचा धडाका!

By Xtralarge News

February 17, 2021 7:57 pm

Ads

आदित्य ठाकरेंचा मुंबईतील विकास कामांच्या आढावा बैठकांचा धडाका.

मुंबई, दि. १७ फेब्रुवारी :
मुंबई महापालिकेच्या परिमंडळ ६ मधील एस वॉर्डातील चालू तसेच प्रस्तावित विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामांचा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. पवई लेकचे सुशोभीकरण, लेक परिसरात पायाभूत सुविधांचा विकास, पाथवेचा विकास आणि पर्यटनाच्या अनुषंगाने तिथे सोयी-सुविधा निर्माण करण्यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, आमदार रमेश कोरगांवकर, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांच्यासह एस वॉर्डमधील संबंधीत नगरसेवक, वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

परिमंडळ ६ मधील विविध विकासकामांचा ठाकरे यांनी नुकताच आढावा घेऊन या कामांना चालना देण्यात आली होती. त्यातील काही प्रश्नांचा आज पुन्हा आढावा घेऊन ही कामे गतिमान करावी, अशा सूचना मंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या. विशेषकरुन शहरातील काही भागात पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचा प्रश्न काही नगरसेवकांनी मांडला. उन्हाळा सुरु होण्यापुर्वी यासंदर्भात पाहणी करुन आणि आढावा घेऊन शहरात पाणीटंचाई निर्माण होणार नाही यासाठी कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना मंत्री ठाकरे यांनी दिल्या.

वरळी-शिवडी कनेक्टर संदर्भातही पालकमंत्री ठाकरे यांनी या मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या पुलाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून काम जलदगतीने पूर्ण व्हावे यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. यावेळी आमदार सदा सरवणकर, आमदार अजय चौधरी यांच्यासह एमएमआरडीए आणि मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment