Ads

-

मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहे का? 

By Xtralarge News

February 2, 2021 8:37 pm

Ads

मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहे का?  नवाब मलिक

दिल्ली बॉर्डरवर केंद्र सरकारच्या बंदोबस्तावर नवाब मलिक यांनी साधला निशाणा.

मुंबई दि. २ फेब्रुवारी:

दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन सुरू असून बॉर्डर छावणीत रुपांतरीत करण्यात आले आहे. मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

शेतकर्‍यांसाठी बंदोबस्त लावताय की चीन सीमेवर की पाकिस्तान सीमेवर बंदोबस्त लावताय अशी विचारणा करतानाच जनरल डायर नीतीने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचे काम योग्य नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

ही सगळी परिस्थिती निर्माण करुन दडपशाहीने आंदोलन संपवण्याचा डाव केंद्रसरकारचा आहे हे लोक स्वीकारणार नाही. ही डायर नीती बंद करावी असेही नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला ठणकावले आहे.

चार – चार बॅरिकेटर, रोडवर खिळे टाकण्यात आले आहे.शेतकऱ्यांचे अन्नपाणी बंद करायचे आणि अडचणीत येतील असा प्रयत्न होतोय ही लोकशाही पध्दत नाही तर मोदी वेगळ्या पध्दतीने चालवत आहे हे जनता कधीच स्वीकारणार नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment