Ads

-

फडणवीस राजकारणातले कृष्ण आता सुदर्शनचक्र काढावेच लागेल!

By Xtralarge News

January 29, 2021 11:31 am

Ads

फडणवीस राजकारणातले कृष्ण आता सुदर्शनचक्र काढावेच लागेल!

मुंबई, दि. 29 जानेवारी:
जो जनतेसाठी काम करतो तोच जनतेसमोर त्या कामाची मांडणीही ठासून करू शकतो . प्रवीण दरेकर यांनी जास्त वेळ विरोधी पक्षनेते राहू नये एवढीच इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण आहेत, त्यांनी आता मात्र सुदर्शन चक्र काढावाच लागेल. बस ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातूनच काढावे असे भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटले .

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी शेलार बोलत होते.

याप्रसंगी भाजप मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, प. पू. सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली यांनीही दरेकर यांना शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यास पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विधिमंडळ गट उपनेते विजय़ (भाई) गिरकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार प्रसाद लाड, आमदार राहुल नार्वेकर,आमदार जयकुमार रावल, आमदार मनीषा चौधरी, आमदार परिणय फुके, आमदार श्वेता महाले, आमदार सुरेश धस, माजी आमदार राज पुरोहित, आमदार तमिल सेल्वन, आमदार रमेश पाटील, आमदार निलय नाईक, आमदार योगेश सागर, चित्रा वाघ यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर देखील मान्यवर उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment