Ads

---

प्रजासत्ताकदिनी सोलापुरात सायक्लोथान !

By Xtralarge News

January 27, 2021 10:55 am

Ads

प्रजासत्ताक दिनी सोलापुरात सायक्लोथान !

सोलापूर, दि. २७ जानेवारी:
प्रजासत्तादिन विविध कार्यक्रमांनी साजला केला जातो. यावर्षी सोलापुरात प्रजासत्ताकदिनी सायकल लव्हर्स ग्रुप यांनी सायकलोथॉन आयोजित केली होती. २६ किमी व ७२ किमी या दोन प्रकारात ही सायक्लोथॉन घेण्यात आली.

कोरोनाचे संकट आता जवळपास संपल्यासारखेच असल्याने विविध कार्यक्रम आयोजित केले जा असून सोलापुरात आयोजित केलेल्या सायक्लेथॉनलही चांगला प्रतिसाद मिळाला.
या सायक्लोथॉनसाठी अमेय केत, अविनाश देवडकर, डॉ प्रवीण ननवरे, आदित्य यांनी खूप मेहनत घेतली त्या परिश्रमामुळे ही सायकलोथॉन यशस्वी
झाली.

या सायक्लोथॉनमध्ये सोलापूरातील पोलिस मित्रांनीही सहभाग घेतला होता. सोलापुरात पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, विजयानंद पाटील, दादाराव इंगळे, सचिन वाघमारे, दीपक नारायणकर, बाबा गाय गवळी, राहुल कुंभार, प्रवीण जवळकर, रमेश सोनटक्के यांनीही सहभाग घेतला होता. या सर्वांनी ७२ किलोमिटरचे अंतर पूर्ण केले.

ही सायक्लोथॉल यशस्वीपणे पार केलेल्या तसेच स्पर्धेत सहभागी घेतलेल्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागी सायकल स्वारास सायकल लवर्सकडून सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

No comments to show.

Leave a Comment