Ads

-

राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, शेतकऱ्यांना भेटायला नाही !

By Xtralarge News

January 25, 2021 7:17 pm

Ads

राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, शेतकऱ्यांना भेटायला नाही !
मुंबई, दि. 25 जानेवारी:

शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत आझाद मैदानावर विविध शेतकरी संघटना व महाविकास आघाडीने आंदोलन केले. आंदोलनांवर शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार होते पण गोव्याला गेले आहेत असे सांगत , ‘तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात पण राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.

पवार पुढे म्हणाले, राज्यपालांची ही नैतिक जबाबदारी होती. राज्यातला कष्टकरी, अन्नदाता त्यांना निवेदन देण्यासाठी येणार होता त्याला सामोरं येणं अपेक्षित होतं. पण त्यांच्याकडे सभ्यता नाही. निदान राजभवनात तरी बसायला हवं होतं.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी देखील एकवटलेत. मुंबईतील आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने जमलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही संबोधित केले.

No comments to show.

Leave a Comment