अर्णब गोस्वामीवर कारवाई करा!
अर्णब गोस्वामीवर कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक.
राज्यभरात धरणे आंदोलन करून केली अर्नबच्या अटकेची मागणी.
अर्नब गोस्वमीच्या प्रतिमेला जोडे मारून केला निषेध..
मुंबई , दि. 23 जानेवारी:
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून देशाच्या सुरक्षेसंबंधीची अत्यंत गोपनीय माहिती अर्नब गोस्वामीला मिळत होती व अर्नब गोस्वामी आपल्या चॅनलचा टीआरपी वाढविण्यासाठी या माहितीचा वापर करत होता हे अत्यंत गंभीर असून हा राष्ट्रद्रोहच आहे. या प्रकरणी अर्नब गोस्वामीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी काँग्रेसने राज्यभर धरणे आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी अर्नब गोस्वामीच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला.
देशद्रोही अर्णब गोस्वामीला अटक करा या मागणीसाठी मुंबई काँग्रेसच्या वतीनेही जांबोरी मैदानातून रिपब्लिक टीव्ही च्या ऑफीसवर मोर्चा काढण्यात आला होता.
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी याची माहिती अर्नब गोस्वामीला कशी मिळाली? त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.
अर्नब गोस्वामी यांचे कृत्य हे कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे तर आहेच पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे अर्नब गोस्वामी विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी राज्यभरातील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा मुख्यालयी धरणे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी अर्नब गोस्वामीच्या प्रतिमेला जोडे मारून त्याचा निषेध केला.
