Ads

-

राष्ट्रवादीने सर्वात जास्त ३२७६ ग्रामपंचायती जिंकल्या!

By Xtralarge News

January 19, 2021 7:04 pm

Ads

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या – जयंत पाटील

भाजप महाराष्ट्रात २० टक्केही नाही…

मुंबई दि. १९ जानेवारी:

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

१३ हजार २९५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये ३ हजार २७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी विजयी झाली आहे. तर काँग्रेस – १९३८, भाजप – २९४२, शिवसेना – २४०६ यांनी एवढया ग्रामपंचायती घेतल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस तळागाळातील पक्ष असल्याचे आज सिद्ध झाले आहे. वेगवेगळया जिल्हयात वेगवेगळे पक्ष पुढे आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांचा दावा आहे. मात्र महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजप महाराष्ट्रात २० टक्केही नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

No comments to show.

Leave a Comment