Ads

-

अर्णबच्या WhatsApp chat ची चौकशी करा!

By Xtralarge News

January 18, 2021 9:42 pm

Ads

अर्णव आणि पार्थ दासगुप्ता व्हॉटस्ॲप चॅट प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी – महेश तपासे..

मुंबई दि. १८ जानेवारी:

अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉटस्ॲप चॅट प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली असून मंगळवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची यासंदर्भात भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

दरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अर्णव गोस्वामी यांच्याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

मुंबई पोलिसांनी अलीकडेच अर्णव गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉटस्ॲप चॅट उघडकीस आणले आहे. राष्ट्रीय सुरक्षा संबंधित मुद्द्यांचा टीआरपी मिळवण्यासाठी कसा उपयोग केला गेला हे जाणून घेणे अत्यंत धक्कादायक आणि त्रासदायक आहे असा संवेदनशील माहितीवर अर्णव गोस्वामी यांना कशी माहिती मिळते असा प्रश्नही पडतो.

मुंबई पोलिसांची आणि महाविकास आघाडी सरकारचीही प्रतिमा खराब करण्यासाठी अर्णव आघाडीवर होता. त्याच्या टीव्ही वादविवादामध्ये त्यांनी पालघर घटनेला जातीयवादी दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न केला. सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरण प्रमाणापेक्षा दाखवले गेले आणि खोटे कथानकही ठरविले गेले.महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याच्या उद्देशाने केले गेले आहे असे दिसते.

व्हॉटस्ॲप चॅट प्रकरण उघड झाल्यानंतर मोदी सरकार आणि भाजप अर्णव प्रकरणावर पूर्णपणे गप्प बसल्याचे दिसत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी पुढे येऊन मुंबई पोलिसांच्या तपासाची प्रशंसा केली पाहिजे आणि भाजपाने अर्णव गोस्वामी यांच्यावरील आपले स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

 

No comments to show.

Leave a Comment