धनंजय मुंडेंना लफडं महागात पडणार?
धनंजय मुंडेंना लफडं महागात पडणार?
धनंजय मुंडेंचं मंत्रीपद जाणार की राहणार !
शरद पवार यांचा धनंजय मुंडेंबद्दल सुचक इशारा..
मुंबई, दि. 14 जानेवारी:
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्याने मुंडे यांचे काय होणार याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की,
धनंजय मुंडे मला भेटले यावेळी त्यांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते, त्यातून काही तक्रारी झाल्या. पोलीस स्टेसनमध्ये तक्रार झाली आणि आता चौकशी प्रक्रिया सुरु झाली असेल. हे प्रकरण असं होईल आणि व्यक्तीगत हल्ले होतील असा अंदाज असावा म्हणून आधीच त्यांनी हायकोर्टात जाऊन आपलं म्हणणं मांडलं असेल. त्यांनी आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे त्याच्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाही.
त्या आरोपाचं स्वरुप गंभीर आहे. यासंबंधी पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. पक्षातील प्रमुख नेत्यांशी अद्याप चर्चा झालेली नाही. सर्वांना विश्वासात घेऊन विषय मांडणार आहे. मुंडे यांनी मला सखोल आणि सविस्तर माहिती दिली असून ती इतर सहकाऱ्यांना सांगणं माझं कर्तव्य आहे. त्यांचं मत घेऊन पुढील पाऊलं टाकलं जातील. याला जास्त वेळ लागेल असं वाटत नाही. कोर्टातील गोष्टींमध्ये मी पडत नाही, पण पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागलीत ते तातडीने घेऊ, असे पवार म्हणाले .
शरद पवार पुढे म्हणाले की, मला आधी माझा निर्णय तर घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्री वैगेरे बघू. आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील भूमिका काय असेल त्यासंबंधी निर्णय़ घेऊ. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वाट पाहण्याची कारण नाही. पक्षप्रमुख म्हणून निर्णय घ्यावा लागेल. त्यामध्ये कोणावर अन्याय होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल.
