Ads

-

ड्रग्ज प्रकरणी प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’ला अटक!

By Xtralarge News

January 12, 2021 11:30 am

Ads

ड्रग्ज प्रकरणी प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’ला अटक!
मुंबई, दि. 12 जानेवारी:
नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) ड्रग्ज प्रकरणी सुरु केलेल्या मोहिमेत बॉलिवूडमधील छोट्या मोठ्या स्टार्स व त्यांच्याशी संबंधित लोकांची चौकशी करून काहींना अटक केलेली असताना आता आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे. हा कोणी स्टार नसून मुच्छड पानवाला आहे नावाने प्रसिद्ध असलेला जयशंकर तिवारी आहे. एनसीबीने सोमवारी रात्री त्याला अटक केली आहे.

अनेक हायप्रोफाइल उद्योजक, सेलिब्रेटी खेळाडू हे मुच्छड पानवाल्याकडून त्यांना हवे असलेला ‘मसाला’ घेत असतात. ड्रग्ज प्रकरणात ब्रिटीश नागरिक करण सजनानीच्या चौकशीतून मुच्छड पानवाल्याचे नाव समोर आले होते. हा ब्रिटीश नागरिक ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे.

एनसीबीने करण सजनानी आणि बॉलीवूड अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर राहिला फर्निचरवाला यांना गांजासह अटक केली होती. यावेळी करण सजनानी याच्याकडून मुच्छड पानवाल्याला गांजा पुरवला जात होता अशी माहिती चौकशीत समोर आली.

‘मुच्छड पानवाला’ हा मुंबईतील प्रसिद्ध पानवाला आहे. १९७० पासून केम्स कॉर्नर परिसरात त्याचे दुकान आहे. हा मुच्छड पानवाला मर्सिडीज कारमधून फिरतो. २०१६ मध्ये त्याने ऑनलाइन ऑर्डर घेण्यासाठी वेबसाईटही सुरु केली आहे.

 

No comments to show.

Leave a Comment