मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये !

0
20210108_165137

मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये !

औरंगाबाद, दि. 8 जानेवारी.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार हे नक्की झाले असून नाशिकला ते होणार आहे. २०२०-२१ च्या मार्च महिन्याच्या अखेरीस हे संमलेन होत असून संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.

९४ व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचे एक आणि अंमळनेरवरुन एक अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठवले होते, यामध्ये मे महिन्यांत दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी केली होती. यातून नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्विकारण्यात आले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला व्हावे, अशी मागणी सरहद्द संस्थेचे निमंत्रक संजय नहार यांनी केली होती. त्यांच्या मागणीचा आदर करून दिल्लीकरांसाठी एक ‘विशेष’ साहित्य संमेलन घेण्याचा विचार महामंडळ करील, असे नहार यांना सुचवण्यात आले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *