‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’!

0
IMG_20201201_163735

‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’!
मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिवसेनेची तयारी.

मुंबई, दि. 5 जानेवारी:

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यावेळी वेगळी राजकीय समीकरणं पहायला मिळणार आहेत. भाजपा बरोबर युती तोडल्याने शिवसेना आता वेगळे पर्याय शोधत आहे. त्यातच मराठी बरोबर गुजराती मतदारांना आपल्याकडे वळवून भाजपालाही दणका देण्याचा शिवसेनेचा विचार आहे. यातून गुजराती लोकांचा मेळावा घेतला जात आहे.

शिवसेनेने अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली असून, ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असे म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे.

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याने राज्यातील सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपा सरकार स्थापन करु शकला नाही. त्यामुळे आता भाजपाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. सर्वच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढणार असल्याचंही जाहीर केलं आहे.

शिवसेनेनेही तयारीला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून शिवसेनेकडून गुजरातींसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला ही अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. १० जानेवारीला जोगेश्वरीत हा मेळावा पार पडणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *