Ads

-

पुण्याचे नामांतर ‘संभाजीनगर’ करा !

By Xtralarge News

January 5, 2021 3:15 pm

Ads

पुण्याचे नामांतर ‘संभाजीनगर’ करा !
औरंगाबाद नामांतराचा मुद्दा तापला.

मुंबई, दि. 5 जानेवारी:
औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा सध्या राज्यात गाजत आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे ही शिवसेनेची जुनीच मागणी आहे. त्यातच औरंगाबाद महानगरपालिका निवडणुक असल्याने नामांतराचा मुद्दा चर्चेत येणारच. पण महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र या नामांतरासाठी ठाम विरोध केला आहे.

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मात्र औरंगाबाद ऐवजी पुणे जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आंबेडकर म्हणतात, ‘औरंगाबाद ऐवजी पुण्याला संभाजी महाराजांचे नाव द्या. संभाजी महाराज यांच्यावर पुणे जिल्ह्यात अंत्यसंस्कार झाले आहेत. पुणे जिल्ह्यात त्यांची समाधी आहे. त्यामुळं संभाजी महाराजांचं स्मरण राहावं, असं वाटत असेल तर ती योग्य भूमी पुणे आहे. त्यामुळं पुण्याला संभाजी महाराजांचे नाव दिलं तर अधिक योग्य होईल. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिक राहायला हवं. मुघलांच्या काळात औरंगाबाद राजधानी होती,’ असं ते म्हणाले आहेत.

पाच वर्ष सरकारमध्ये असताना भाजप-शिवसेनेनं औरंगाबाद शहराचं नाव का बदललं नाही?,’ असा सवालही त्यांनी केला आहे.

भाजपानेही निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा अशी केली आहे.

No comments to show.

Leave a Comment