औरंगाबादच्या नामांतराविषयी शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी!
औरंगाबादच्या नामांतराविषयी शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी !
शिवसेनेला सत्तेची लाचारी हवी की, अस्मिता हवी!
पुणे, दि. 4 जानेवारी:
औरंगाबादच्या नामांतराला कॉग्रेसचा ठाम विरोध आहे. तर शिवसेना या विषयावरुन कोणतीही ठाम भूमिका घेत नसून त्यांची भूमिका सध्या दुटप्पी व धरसोड स्वरुपाची आहे, त्यामुळे या नामकरणासंदर्भात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
पुणे दौ-यावर असताना पत्रकार परिषदेत बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, महाविकास आघाडी मधील कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला विरोध केला आहे, तर कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीही इशारा दिला आहे की, सरकार आमच्यामुळेच आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार हा विषय आमच्या अजेंडावर कधीच नव्हता. त्यामुळे शिवसेनेला सत्तेची लाचारी हवी की, अस्मिता हवी हे शिवसेनेने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना नेते संजय राऊत सांगत आहेत की हा विषय आम्ही मिटवू तर त्याचवेळी शिवसनेचे चंद्रकांत खैरे हे नामांतराला कोणी विरोध केल्यास जशास तसे उत्तर देऊ अशी भूमिका घेत आहेत, पण ती कितपत खरी आहे, शिवसेनेचे आमदार आंबदास दानवेही या विषयावर नरो वा कुंजरोवाची भूमिका घेत आहेत. असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, या सर्व विषयाबाबतीत पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारचे प्रमुख म्हणून आपली काय भूमिका आहे हे राज्यातील जनतेला स्पष्ट करावी.
संजय राऊत यांनी ट्विट केले होते की, देवेंद्र फडणवीस यांनी नामांतर का केेेेले नाही पण कदाचित राऊत यांना ही प्रक्रिया माहित नसावी किंवा जाणूनबुजून ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे असे सांगताना दरेकर म्हणाले की, देवेंद्रजींच्या पाच वर्षाच्या काळात कुठल्याही महानगरपालिने तसा ठराव केला नव्हता. पण जर राज्य सरकारची इच्छा असेल व तर कॅबीनेटने तसा निर्णय घ्यायला हवा. परंतु त्यापेक्षा शिवसेनेला आज सत्ता महत्वाची आहे, की संभाजीनगरच्या बाबतीत आपली भूमिका अश्या गोंधळलेल्या अवस्थेत शिवसेना आज आहे म्हणून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
