सीबीएसई १० वी, १२ वीच्या परीक्षा ४ मे पासून!

0
20210101_132454

सीबीएसई १० वी, १२ वीच्या परीक्षा ४ मे पासून!

नवी दिल्ली, दि. १ जानेवारी.

कोरोनामुळे दहावी बारावीच्या परिक्षा कधी होणार हा महत्वाचा मुद्दा होता पण आता यावर पडदा असून सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सीबीएसई बोर्डाने मे महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021  ची प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्च रोजी होणार आहे. तर  लेखी परीक्षा ४ मे पासून सुरु होतील आणि १० जूनपर्यंत सुरु राहतील. तर निकाल १५ जुलैपर्यंत लागणे अपेक्षित आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात घोषणा केली.

सीबीएसई परीक्षेचे १० वी आणि १२ वीचे सविस्तर वेळापत्रक लवकरच वेबसाईटवर उपलब्ध होईल. १० वी आणि १२ वीच्या अंतर्गत मूल्यमापनाला १ मार्च पासून सुरुवात होणार आहे.

पोखरियाल म्हणाले, ‘आम्ही सातत्याने विद्यार्थी-शिक्षकांशी परीक्षांसंबंधी संवाद साधत आहोत. करोना संकट काळात ज्या पद्धतीने तुम्ही स्वत:ला तयार केले आहे, विशेषत: शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या काळात खूप संयमाने, तयारीने आणि संपूर्ण मनोबलाने परीक्षा दिली, अभ्यास केला, शिक्षकांनी शिकवले आणि विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचवले. शिक्षकांनी या महामारी काळात खूप चांगली कामगिरी केली आहे. इतक्या कोटी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणं हे खरंच खूप मोठं आव्हान होतं आणि ते आपण पेललं. काही विद्यार्थ्यांना सुविधांअभावी सुविधा मिळाली नाही, त्यांना आपण टीव्ही आणि अन्य माध्यमांनी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *