Ads

-

आंतरराष्ट्रीय हवाईसेवा ३१ जानेवारीपर्यंत बंद!

By Xtralarge News

December 30, 2020 7:50 pm

Ads

नव्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय..

नवी दिल्ली, दि. ३० डिसेंबर:
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडल्यामुळे जगभरात खळबळ माजली असून ब्रिटनला जाणाऱ्या व येणाऱ्या हवाई वाहतुकीवर भारतासह विविध देशांनी बंदी घातलेली आहे. भारताने ही बंदी आता ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवली आहे. आधी ही बंदी ३१ डिसेंबरपर्यंत होती ती वाढवून ७ जानेवारी केली होती पण आता त्यात वाढ करून ३१ जानेवारी केली आहे.

कोरोनाच्या नव्या विषाणूने भारतातही शिरकाव केला आहे. भारतात जवळपास २० कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांच्या शरीरात कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. भारतानेही नव्या कोरोनाचा धोका लक्षात घेऊन ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली होती. मात्र, त्यापूर्वीच भारतात दाखल झालेल्या प्रवाशांच्या माध्यमातून कोरोनाच्या नव्या विषाणूने देशात शिरकाव केला आहे. मंगळवारी सहा करोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नवा विषाणू आढळून आला होता. ही संख्या आज २० वर गेली आहे. त्याचबरोबर या पॉझिटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात आलेले नागरिकही पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

 

No comments to show.

Leave a Comment