20201217_142646

मला तोंड उघडायला लावू नका !
ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊत आक्रमक.
मुंबई, दि. २८ डिसेंबर:
ईडीने आता आपला मोर्चा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडे वळवला. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहे. प्रताप सरनाईक यांची चौकशीही ईडीकडून सध्या सुरुच आहे. त्यामुळे ईडीच्या समन्सनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर चौफेर हल्ला केला.

संजय राऊत म्हणाले, मला तोंड उघडायला लावू नका भाजपाच्या नेत्यांची संपत्ती १६०० पटीने कशी वाढली याचा हिशोब माझ्याकडे आहे. महाराष्ट्रातले सरकार पाडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न आहेत. ईडी भाजपाचा पोपट असला तरीही मला ती सरकारी संस्था असल्याने माझ्या मनात ईडीबद्दल आदरच आहे. माझ्याकडे भाजपाच्या १२० नेत्यांची यादी आहे ते सगळे ईडीच्या रडारवर येऊ शकतात.

भाजपाचे काही मध्यस्थ आहेत जे मला वारंवार भेटले आहेत मागच्या वर्षभरात त्यांनी मला भेटून हे सरकार पाडण्यासाठी सांगितलं आहे. मी जर ठरवलं तर भाजपाच्या दिग्गज नेत्यांना नीरव मोदी आणि विजय मल्ल्यासारखं परदेशात पळून जावं लागेल. भाजपाची काही माकडं अकारण उड्या मारत आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपाची माकडं कालपासून उड्या मारत आहेत. हे सरकार आम्हाला पाडायचं आहे. आमची यंत्रणा सज्ज आहे, तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका असंही सांगितलं जातं आहे. धमकावलंही जातं आहे. पण मी कुणालाही घाबरत नाही मी या सगळ्यांचा बाप आहे. सरकार पाडण्यासाठी भाजपाचा कट शिजला आहे. असेही राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *