Ads

--

वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी महापौर !

By Xtralarge News

December 26, 2020 6:52 pm

Ads

वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी महापौर!

देशातील सर्वात तरुण महापौरपदाचा विक्रम.

तिरुवनंतपुरम, दि. २६ डिसेंबर:

वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी महापौर बनत देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे तो केरळमधील आर्या राजेंद्रन हिने.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची आर्या सदस्या असून  पक्षाने तिला तिरुवनंतपुरमच्या महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. आर्याने मुदवनमुकल वार्डामधून निवडणूक जिंकली आहे.

मी एक विद्यार्थिनी असल्यामुळे लोकांनी मला निवडले आहे, लोकांना सुशिक्षित प्रतिनिधी हवा आहे म्हणूनच मला त्यांनी निवडले असे मत आर्याने व्यक्त केले आहे. आपण आनंदाने ही जबाबदारी स्वीकारणार असल्याचेही आर्याने सांगितले.

आर्या बीएस्सी मॅथेमॅटिक्सच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. आर्या राजेंद्रन ही पाचवीत शिकत असल्यापासून CPIM पक्षाची सदस्य आहे. तिने पक्षाच्या बालसंगम विंगसाठी काम केलंय. नंतरच्या काळात बालसंगमची जिल्हा अध्यक्षा आणि राज्याची प्रमुख या पदावरही तिने काम केले आहे. आर्यावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन व आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांचा प्रभाव आहे, तर नव्या पदासह आर्या आपलं शिक्षणही पुढे सुरु ठेवणार असल्याची माहिती ही तिने दिली.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वयाच्या २७ व्या वर्षी १९९७ साली नागपूरचे महापौर झाले होते. तर वयाच्या २१ व्या वर्षी फडणवीस वयाच्या २१ व्या वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकून नगरसेवक झाले होते.

 

No comments to show.

Leave a Comment