पीएम केअर्स फंडात चिनी कंपन्यांच्या देणग्या?  

0
PM care

मुंबई, दि. २८ जून २०२०

चीनप्रश्नावरून देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना काँग्रेसने आक्रमक होत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. चीनसीमेवर गेल्या काही महिन्यांपासून तणाव असताना अनेक चीनी कंपन्यांनी पंतप्रधान केअर्स फंडाला कोट्यवधी रूपयांचा निधी दिला आहे. नरेंद्र मोदी आणि चीन यांचे नेमके काय साटेलोटे आहे? याचा खुलासा सरकारने करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

थोरात म्हणाले की, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार २० मे २०२० पर्यंत या पीएम फंडात ९६७८ कोटी रुपये जमा झालेत. अनेक चीनी कंपन्यानी या पीएम केअर्स फंडाला मोठा निधी दिला आहे म्हणून काँग्रेस पक्षाचे केंद्र सरकारला प्रश्न आहेत…

१) २०१३ मध्ये चीनने सीमेवर कुरापती केल्या असतानाही पंतप्रधान मोदी यांनी चीनच्या कंपन्यांकडून निधी का घेतला?

२) चिनची वादग्रस्त कंपनी HUAWEI कडून पंतप्रधानांनी ७ कोटी रुपये घेतले का? या कंपनीचे चीनचे लष्कर पीपल्स लिबरेशन आर्मीशी संबंध आहेत का?

३) चीनच्या TIKTOK कंपनीने पीएम केअर फंडात ३० कोटींची देणगी दिला आहे का?

४) पेटीएम ने याच पीएम केअर फंडात १०० कोटी दिले आहेत का?.

५) XIAOMI, या कंपनीने याच फंडात १५ कोटी दिले आहेत का?

६) OPPO, कंपनीने पीएम केअरमध्ये १ कोटी दिलेत का?

७) मोदींनी पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंडातील देणग्या पीएम केअर फंडात वळवल्या आहेत का?

हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात चिंताजनक व गंभीर बाब असून याची उत्तरे जनतेला द्यावी अशी मागणी थोरात यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *