भाजप आणि रासपाच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
IMG-20201223-WA0033

राष्ट्रवादीत भाजप आणि रासपाच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश.

 

मुंबई दि. २३ डिसेंबर :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दौंड तालुक्यातील भाजप व रासपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर व माजी आमदार रमेश थोरात यांच्या पुढाकाराने दौंड येथील तात्यासाहेब ताम्हाणे, पोपटराव बोराटे, चंद्रकांत कारंडे, दादासो भिसे, जनार्दन सोनवणे, प्रकाश टिळेकर, अशोकराव बोराटे, संतोष जाधव, शिवराम ताम्हाणे, आतिष बोराटे, सतिश खुने, बिभिषण खुने, संतोष ढोरले यांनी प्रवेश केला.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, गृहमंत्री अनिल देशमुख,आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *