20201108_173706

भारतात फेसबुकवर भाजपा-आरएसएसचे नियंत्रण!

फेसबुकची बजरंग दलाबाबत नरमाईची भूमिका

नवी दिल्ली, दि. 15 डिसेंबर:
देशातील प्रमुख प्रसार माध्यमांवर भारतीय जनता पार्टीचे नियंत्रण असून त्यांच्या माध्यमातून मोदी सरकार आपल्याला तो अजेंडा राबवत असतो. या मीडियाच्या माध्यमातून सरकार विरोधात कोणताच आवाज येऊ दिला जात नाही. मोदी सरकारची प्रतिमा संवर्धन करण्यातच यातील बहुतांश माध्यमं व्यस्त असतात. त्यांच्या जोडीला फेस बुक सुद्धा भाजपाला सोयीस्कर अशीच भूमिका घेत असल्याचे उघड झाले आहे. पुन्हा एकदा फेस बुक हे भाजपा आरएसएस
धार्जिणे असल्याचे उघड झाले आहे.

फेसबुकबाबत ‘वाॅल स्ट्रिट जनरल’ने प्रकाशित केलेल्या एका नव्या रिपोर्टनंतर काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी म्हणाले, ‘भाजपा आणि आरएसएसचं भारतातल्या फेसबुकवर नियंत्रण आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

बजरंग दलावर कारवाई केल्यास फेसबुकच्या भारतातील व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, तसंच त्यांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला होऊ शकतो त्यामुळे फेसबुकने बजरंग दलाबाबत नरमाईची भूमिका घेतली आणि बजरंग दलाला ‘धोकादायक संघटना’ मानण्यास नकार दिला, असा दावा अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राने केला आहे. या रिपोर्टवरुन काँग्रेस खा. राहुल गांधींनी भाजपा आणि आरएसएसला लक्ष्य केले आहे.

फेसबुकच्या सुरक्षा टीमकडून संभाव्य धोकादायक संघटना म्हणून टॅग केल्यानंतरही भारतात अल्पसंख्यांकाविरोधात हिंसेचं समर्थन करणाऱ्या बंजरंग दलाबाबत फेसबुकची नरमाईची भूमिका असल्याचं वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये नमूद करण्यात आलं आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या नव्या रिपोर्टमध्ये बजरंग दलाचा एक व्हिडिओ आणि त्याच्यावर फेसबुकने केलेल्या कारवाईचा दाखला दिला आहे.

जून महिन्यात नवी दिल्लीत एका चर्चवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी बजरंग दलाने घेतल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडिओ अडीच लाख वेळा पाहिला गेला होता. दरम्यान, वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये यापूर्वी ऑगस्टमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्येही फेसबुक भाजपा नेत्यांच्या हेटस्पीच किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोस्टकडे कानाडोळा करत असल्याचं म्हटलं होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *