Ads

--

तृप्ती देसाई शिर्डीत याच, तुमचे सगळे स्टंट बंद करु!

By Xtralarge News

December 10, 2020 3:37 pm

Ads

तृप्ती देसाई शिर्डीत याच, तुमचे सगळे स्टंट बंद करु !
तृप्ती देसाईंना शिवसेनेच्या रणरागिणींचा इशारा …

शिर्डी, दि 10 डिसेंबर :

शिर्डी देवस्थानने साईभक्तांना पेहरावबाबत आवाहन केल्यानंतर त्याच्या विरोधात काहीजण आवाज उठवत आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी संदर्भात देवस्थानच्या पुजाऱ्यांबद्दलच आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर तृप्ती देसाईंनी शिर्डीला जाऊन साई संस्थानने लावलेल्या आवाहनाचा फलक काढण्याचा निर्धार केला. हे वातावरण तापलेले असतानाच शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तृप्ती देसाई यांना इशारा दिला आहे.

शिवसेनेच्या महिला संघटक स्वाती परदेसी यांनी म्हटले आहे की, तृप्ती देसाई शिर्डीत यायलाच हव्यात. त्यांना इथे आल्यावर कळेल की त्यांनी संस्थानावर केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. त्या इथे आल्या की त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. दरवेळी मंदिरात त्या काही स्टंट करत असतात, त्यांचे ते सगळे स्टंट आम्ही आज बंद करू.

तृप्ती देसाई पुण्याहून शिर्डीला निघाल्या होत्या पण पोलिसांनी त्यांना नगरच्या सीमेवर सुपे टोल नाक्याजवळ रोखून ताब्यात घेतले आणि कार्यकर्त्यांसह सुपे पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

 

No comments to show.

Leave a Comment