दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिल – मे महिन्यात!

0
20201209_100738

दहावी बारावीच्या परीक्षा एप्रिल – मे महिन्यात!

राज्यातील पहिली ते आठवी शाळा कधी सुरु होणार ?

मुंबई, दि. 9 डिसेंबर :
कोरोनामुळे बंद ठेवलेल्या शाळा सुरु करत नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पण पहिली ते आठवी पर्यंतच्या प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबद्दल अजून कोणताही विचार झालेला नाही. विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे .

शाळा सुरू करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेण्यात येईल. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू करण्याचा विचार करता येईल. लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्य विषयक सुचनांचे पालन करणे सोपे नाही.

राज्यभरात ज्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत तिथे विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा या नेहमीच्या पद्धतीने परंतु एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात  होण्याची शक्यता आहे. शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि सरकारचे प्रयत्न यामुळे कोरोनाच्या संकटावर मात करून भविष्यातील वाटचाल उज्ज्वल करू असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *