दाक्षिणात्य अभिनेत्रीची हॉटेलमध्ये आत्महत्या.

0
20201209_123514

दाक्षिणात्य अभिनेत्रीची हॉटेलमध्ये आत्महत्या.
चेन्नई, दि. 9 डिसेंबर.
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री VJ चित्रा हिने आत्महत्या केली आहे. अवघ्या 28 वर्षांच्या चित्राने आत्महत्या केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. चेन्नईतील एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला.

चित्राचा प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवीसोबत नुकताच साखरपुडा झाला होता. त्यानंतर हे दोघं एकत्र रहात होते. इवीपी फिल्मसिटीमधील चित्रीकरण संपल्यानंतर चित्रा रात्री २.३० वाजता हॉटेलमध्ये पोहोचली. त्यानंतर तिने गळफास घेतल्याचं हेमंतने सांगितलं.

शुटींग संपल्यावर चित्रा हॉटेलमध्ये आली आणि आंघोळीला जाते सांगून बाथरुममध्ये गेली. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही, त्यामुळे मी दार वाजवलं. पण आतून कोणताही आवाज आला नाही. त्यानंतर मी हॉटेल स्टाफला सांगून डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला त्यावेळी चित्राचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, अशी माहिती हेमंतने पोलिसांना दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *