शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला वंचितचा पाठिंबा..

0
20201207_094607

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा, राज्यात बंदला चांगला प्रतिसाद

मुंबई, दि. ८ डिसेंबर:

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयक बिलाला विरोध करण्यासाठी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला जुमानत नसल्याने शेतकऱ्यांच्यावतीने आज ‘भारत बंद’ पुकारण्यात आला होता. या बंदला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बंद यशस्वी करताना हा बंद शांततेने पार पाडावा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.

केंद्र सरकारने तीन कृषीविषयक बिल पास केले आहे हे शेतकऱ्यांच्या विरोधात असून त्याला पंजाब, हरियाणा मधील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे. गेल्या १३ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलनाला सुरुवात केली आहे. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी आज भारत बंद पुकारला होता. या बंदला देशातील २० विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला असून राज्यात वंचित बहुजन आघाडीने या बंदला पाठिंबा दिला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले होते. राज्यात कार्यकर्त्यांनी बंद करण्यासाठी आंदोलन करावे, मात्र हे आंदोलन शांततेत करावे असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *