Ads

-

‘निर्भया’ फंडातील निधीचा सुयोग्य वापर करा!

By Xtralarge News

December 2, 2020 10:17 pm

Ads

निर्भया फंडातील निधीचा सुयोग्य वापर करा.

मुंबई, दि. 2 डिसेंबर :
राज्यासाठी निर्भया फंडामधून प्राप्त होणाऱ्या निधीचा वापर महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुयोग्यपणे करावा तसेच महिलांसाठी असलेल्या विविध योजनांकरिता निधी उपलब्ध करुन घेण्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिल्या
आहेत.

मंत्रालयात आज याविषयावर एक बैठक झाली.
निर्भया फंडांतर्गत उपलब्ध असलेला निधी राज्यांना वितरित करण्याबाबत केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने निर्धारित केलेले निकष व त्याबाबतची कार्यपध्दती या बैठकीत विषद करण्यात आली. राज्यासाठी निर्भया फंडामधून प्राप्त होणारा निधी, महिलांच्या अन्य योजनांसाठी निधी यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.

‘कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व’ फंडाबाबतही (सीएसआर) आढावा घेण्यात आला. सीएसआर निधीतून जुन्या अंगणवाड्या दुरुस्त करणे, नव्या अंगणवाड्या बांधणे याबाबत चर्चा झाली. बाल धोरण ठरविण्याबाबत व सुधारणा करण्याबाबतही आढावा घेण्यात आला.

 

No comments to show.

Leave a Comment