Ads

--

‘जलयुक्त’ची चौकशी आकसाने व सुडाने!

By Xtralarge News

December 2, 2020 12:54 pm

Ads

‘जलयुक्त’ची चौकशी आकसाने व सुडाने !

जलयुक्तच्या चौकशीतून योग्य तेच बाहेर येईल.

मुंबई, दि. 2 डिसेंबर:

ठाकरे सरकारने देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवारची चौकशी सुरू केल्यानंतर भाजपा नेते फडणवीस यांचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत.

चौकशी संदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले, ‘ देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी योजनेच्या मार्फत राज्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला होता अन्य राज्यांनीही आदर्श घ्यावा अशी ही योजना होती परंतु आकसाने व सुडाने लावलेल्या चौकशीचा फडणवीस यांच्याशी काही संबंध नाही. अखेरीच या चौकशीतून योग्य तेच बाहेर येईल असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात या कामाचे नियोजन आणि कार्यवाही होते. मंत्रालयात अथवा मुख्यमंत्र्यांचा याचा दुरान्वये संबंध नाही तथापि या योजनेचे अपयश दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न महाविकास सरकार कडून होत आहे, त्यामुळे या प्रकारच्या चौकशीचा काडीमात्र फरक भाजपा किंवा फडणवीस यांच्यावर होणार नाही, असेही दरेकर यांनी सांगितले.

 

No comments to show.

Leave a Comment