शेतकऱ्यांना खलीस्तानी ठरवणारे अमित शहा कोण लागून गेले?
शेतकऱ्यांना खलीस्तानी ठरवणारे अमित शहा कोण लागून गेले?
राजू शेट्टींचा नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल.
कोल्हापूर, दि. 1 डिसेंबर:
मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतक-यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मा. खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात आंदोलन केले. आंदोलकांनी पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळा पेटवून दिला.
पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले,“शेतकऱ्यांना खलीस्थानी ठरवणारे अमित शहा कोण लागून गेले?दोन दिवसांत दिल्लीतील शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय न झाल्यास संपूर्ण देश केंद्र सरकारच्या विरोधात पेटून उठेल.
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी विधेयक आणुन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. ही विधेयके मागे घेण्यात यावी. हे आंदोलन पंजाब व उत्तर भारतातील शेतकऱ्यांपुरते मर्यादित नाही, तर हे आंदोलन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांशी निगडित आहे. शेतकरी न्याय मागत असताना शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणे अन्यायकारक आहे, असेही शेट्टी म्हणाले.
