IMG-20201201-WA0036

उर्मिला मातोंडकरांच्या हाती आता शिवबंधन!

मुंबई, दि. 1 डिसेंबर:
बॉलिवूडमधील रंगीला गर्दी उर्मिला मातोंडकर यांनी राजकारणाचा पुनःश्च हरिओम करत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त जागेसाठी शिवसेनेच्या कोटय़ातून उर्मिला मातोंडकर यांचे नाव महाविकास आघाडी सरकारने पाठवले आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेत उर्मिला म्हणाल्या, काँग्रेसमध्ये होते तेव्हा मी पदाची अपेक्षा केली नव्हती. आज शिवसेनेत आले तरीही पदाची अपेक्षा नाही. मला लोकांसाठी काम करायचं आहे म्हणून मी शिवसेनेत आले आहे.

देशाच्या राजकारणात सध्या विषारी वातावरण आहे. बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचा अत्यंत किळसवाणा प्रयत्न मधल्या काळात झाला, मी तेव्हाही कुणाच्या विरोधात बोलले नाही, आताही बोलत नाही. मी महाराष्ट्राच्या बाजूने बोलत आहे, असेही उर्मिला यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *