Ads

-

८ डिसेंबरला विधान भवनावर धडक मोर्चा!

By Xtralarge News

November 29, 2020 6:32 pm

Ads

८ डिसेंबरला विधान भवनावर धडक मोर्चा..

मराठा क्रांती मोर्चाचा महत्त्वाचा निर्णय..

मुंबई, दि. 29 नोव्हेंबर:

मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही. यामुळे मराठा क्रांती मोर्चाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही सरकारने यावर ठोस निर्णय घेतला नाही. या पार्श्वभूमीवर ८ डिसेंबर रोजी विधान भवनावर मराठा क्रांती मोर्चा धडक मोर्चा काढणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

महावितरणमध्ये मराठा समाजाच्या तरुणांची भरती झाली नाही. त्याच्या निषेधार्थ १ आणि २ डिसेंबरला महावितरण अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली जाणार आहेत. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी विधान भवन येथे धडक मोर्चा काढणार आहे. अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यास पुढील दिशा देखील लवकरच ठरविली जाईल, असे सांगण्यात आले आहे .

 

No comments to show.

Leave a Comment