Ads

-

मोदींचा पुन्हा नारा, ‘वन नेशन, वन इलेक्शन’!

By Xtralarge News

November 27, 2020 10:10 am

Ads

मोदींचा पुन्हा नारा, ‘वन नेशन, वन इलेक्शन’!

नवी दिल्ली, दि. 27 नोव्हेंबर :
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ची हाक दिली आहे. भारतात सातत्याने कोणत्या ना कोणत्या निवडणुका होत असतात. त्याचा परिणाम विकास कामावर होतो त्यामुळे आता ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या संकल्पनेवर गंभीरपणे चर्चा करणे आवश्यक झाले आहे.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही संकल्पना याआधी अनेकवेळा चर्चेत आली आहे. यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्यावरुन संबोधन करताना लोकसभा आणि विधानसभा यांच्या एकत्रित निवडणुकीबद्दल आपली कल्पना लोकांसमोर मांडली होती.

वन नेशन, वन मोबिलिटी कार्ड सिस्टमदेखील आपण विकसित केली आहे. आता एक राष्ट्र, एक निवडणूक या संकल्पनेवर चर्चा करणे आणि या संकल्पनेला लोकशाहीच्या माध्यमातून अंमलात आनने आवश्यक आहे. असे मोदी म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment