Ads

--

जळगावचा सुपुत्र श्रीनगर येथे शहीद !

By Xtralarge News

November 27, 2020 9:07 am

Ads

जळगावचा सुपुत्र श्रीनगर येथे शहीद !

गस्ती पथकावर अतिरेक्यांचा हल्ला..

जळगाव, दि. 27 नोव्हेंबर

जम्मू काश्मीरच्या श्रीनगर येथे गस्तीवर पथकावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात जळगाव जिल्ह्यातील सुपुत्र जवान यश दिगंबर देशमुख शहीद झाले.

श्रीनगर शहराबाहेरील एचएमटी परिसरात हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात यश देशमुख यांच्यासह दोघे जवान गंभीररित्या जखमी झाले होते. उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले.

यश देशमुख ११ महिन्यांपूर्वीच पॅरा कंमाडो म्हणून भरती झाले होते. २८ तारखेला त्यांचे पार्थिव त्यांचे गाव पिंपळगाव येथे आणले जाणार आहे..

 

No comments to show.

Leave a Comment