आम्हाला सरकार पाडायचे नाही पण…..

0
20201126_134146

आम्हाला सरकार पाडायचे नाही पण…..

मुंबई, दि. 26 नोव्हेंबर:
महाविकास आघाडीचे सरकार आम्हाला पाडायचे नाही पण ते अंतर्गत वादामुळेच पडेल असे भाजपा वारंवार सांगत आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ही दोन महिन्यात सरकार पडणार असल्याचे म्हटल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. आम्हाला सरकार पाडायचे नाही असे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

दरेकर म्हणतात, ‘सरकार पाडण्यासंदर्भात आमच्या पक्षानं वेळोवेळी भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीमध्ये अंतर्गंत विसंवाद आहे त्यामुळेच त्यांना हे सरकार पडण्याची भीती वाटते. जनतेच्या मनात सरकारविरोधात प्रचंड आक्रोश आहे म्हणूनच सरकार भीतीने पछाडले आहे.

‘भाजप सरकार पाडणार म्हणून लोकांच्या मनात सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे आणि त्यांचे मत दुषित करण्याचा प्रयत्न आहे. परंतु, सरकार आम्हाला पाडायचं नाही,’ असंही दरेकर म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *