Ads

--

महावितरणला बावनकुळेंनी मरणपंथाला नेले!

By Xtralarge News

November 24, 2020 11:40 am

Ads

महावितरणला बावनकुळेनी मरणपंथाला नेले..

विजबिलावरून आजी माजी ऊर्जा मंत्र्यांमध्ये जुंपली..

मुंबई, दि. 24 नोव्हेंबर:
भरमसाठ विजबिलाच्या मुद्यावर राज्यातील वातावरण तापले आहे. भाजपासह इतर विरोधी पक्ष तसेच जनतेतून या लुटमारीवर संताप व्यक्त केला जात आहे. भाजपाने याविरोधात सोमवारी वीजबील होळी आंदोलन केले. यावेळी माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहभाग घेतला होता. याच मुद्यावरून विद्यमान ऊर्जा मंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी बावनकुळे
यांचा समाचार घेतला.

यासंदर्भात बोलताना नितीन राऊत म्हणाले की, “माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिकात्मक चितेवर वीजबिलांना अग्नी दिल्याचे दृश्य मी टीव्हीवर बघितले. चितेला अग्नी देण्याचा अधिकार वारसालाच असतो आणि महावितरणच्या आजच्या स्थितीचे खरे ‘वारस’ चंद्रशेखर बावनकुळे हेच आहेत. ऊर्जा खात्यातील महावितरण त्यांच्याच कार्यकाळात मरणपंथाला लागली. त्यामुळे वीजबिलाच्या प्रतिकात्मक चितेला त्यांनी अग्नी देणे संयुक्तिक होते.

बावनकुळेंनी महावितरणला रूग्णशय्येवर नेले असले तरी आम्ही त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. महावितरणच्या आजारावर उपचार आम्हीच करू. त्याला नवसंजीवनी देऊ. महावितरण पुन्हा धडधाकट करणे हेच आमचे पहिले प्राधान्य राहणार आहे, असे नितीन राऊत म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment