Ads

---

शहीद सुनील काळेंना शोकाकुल वातावरणात निरोप.

By Xtralarge News

June 24, 2020 3:18 pm

Ads

सोलापूर, दि. २४ जून २०२०

अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आलेले सोलापूरचे जवान सुनिल काळे यांच्यावर बार्शी तालुक्यातील पानगाव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीरच्या पुलवामा भागात झालेल्या चकमकीत जवान सुनील काळे शहीद झाले. सुनिल काळे यांना पानगावसह आसपासच्या गावातील शेकडो लोकांनी जड अंतःकरणाने निरोप दिला.

मंगळवारी पहाटे झालेल्या चकमकीत सुनिल काळे यांना वीरमरण आल्याची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली होती. गावातले सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. श्रीनगरहून लष्कराच्या विमानाने पार्थिव पुणे येथे आणण्यात आले व त्यानंतर वाहनाने गावात आणण्यात आले. सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध पक्षाचे नेतेही उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment