Ads

-

महात्मा गांधींचे पणतू सतिश धुपेलिया यांचे निधन.

By Xtralarge News

November 23, 2020 7:20 pm

Ads

महात्मा गांधींचे पणतू सतिश धुपेलिया यांचे दक्षिण आफ्रिकेत करोनामुळे निधन.

मुंबई, दि. 23 नोव्हेंबर:

महात्मा गांधी यांचे पणतू सतिश धुपेलिया यांचे कोरोनाच्या संसर्गाने निधन झाले आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी त्यांनी आपला ६६ वा वाढदिवस साजरा केला होता. न्युमोनियावर उपचार घेत असतानाच त्यांना कोरोनाची बाधा झाली होती अशी माहिती त्यांची बहीण उमा धुपेलिया-मेस्थरी यांनी सोशल मीडियावर दिली.

महात्मा गांधी यांचे चिरंजीव मणिलाल गांधी यांचे ते वंशज आहेत. आपले काम सुरू ठेवण्यासाठी मणिलाल गांधी यांना महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत ठेवले होते.

सतिश धुपेलिया हे मीडियात कार्यरत होते. व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफर म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. दरबनजवळील गांधी विकास ट्रस्टच्या कामकाजात ते सक्रिय होते. त्याशिवाय आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे ते दक्षिण आफ्रिकेतील सर्वच समाजघटकात लोकप्रिय होते. त्याशिवाय धुलेपिया अनेक सामाजिक संघटनांमध्येही सक्रिय होते.

 

No comments to show.

Leave a Comment