20201123_095515

महाविकास आघाडीच्या बैठकीत राडा.

सुशीलकुमार शिंदेंचा फोटो नसल्याने कार्यकर्ते आक्रमक.

सोलापूर, दि. 23 नोव्हेंबर  :
महाविकास आघाडीच्या सोलापूर च्या एका कार्यक्रमात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच राडा केला. कार्यक्रम होता पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील उमेदवारांचा प्रचार. पण व्यासपीठावरच्या बॅनरवर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नव्हता म्हणून शिंदे समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

राज्यमंत्री सतेज पाटील व्यापपीठावरून खाली उतरून कार्यकर्त्यांची समजूत काढत होते तरिही सुशीलकुमार शिंदे समर्थकांनी जोरदार नारेबाजी करत जलसंपदामंत्री जयंत पाटील, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या समोर निषेध नोंदवला.

सोलापूर मतदारसंघ हा विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ आहे. किमान त्यांचा तरी फोटो बॅनरवर लावणे अपेक्षित होते. मात्र कोणताही फोटो या बॅनरवर नसल्याने समर्थकांनी गोंधळ घातला. राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री सतेज पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *