Ads

--

सांगलीत पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागले.

By Xtralarge News

November 22, 2020 5:09 pm

Ads

पाच दिवसात सांगलीत 300 नवे कोरोना रुग्ण.

सांगली, दि. 22 नोव्हेंबर :
कोरोनाची रुग्ण संख्या घटत असल्याचे चित्र निर्माण झाले असताना पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागल्याने चिंताही वाढली आहे. दिवाळी सणात बाजारपेठेत लोकांनी गर्दी केली त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत.

मुंबईनंतर सांगलीत नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसात सांगली जिल्ह्यात ३०१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. दिवाळी आधी ही रुग्णसंख्या २८ पर्यंत खाली गेली होती ती आता ८० पर्यंत जाऊन पोहोचली आहे.

कमी झालेली रुग्ण संख्या १७ नोव्हेंबरपासून पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात 150 रुग्ण वाढले असून सध्या ४०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जुलै ते सप्टेंबर या महिन्यात सांगली जिल्ह्यात रोज सरासरी ७०० ते ८०० रुग्ण आढळत होते.

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी कोरोनाचा पुन्हा फैलाव होण्यास कारणीभूत ठरत असल्याचे दिसते.

 

No comments to show.

Leave a Comment