ऊर्जामंत्र्यांनी महावितरणमध्ये क्लार्कचे काम करावे!

0
Nitin-Raut

वीजबिलावरून भाजपाची ऊर्जामंत्र्यांवर टीकास्त्र..

उस्मानाबाद, दि. २१ नोव्हेंबर

ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्क म्हणून काम करावे. भाजप कार्यकर्ते त्यांना वीज बिलं दाखवतील मग ती वीज बिले तुम्ही तपासा असा मार्मिक टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे.

उस्मानाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, ऊर्जामंत्र्यांनी १०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली पण त्यावरुन सोयीस्कररित्या यु-टर्न घेतला. आता वीजबिलात सवलत देणार असे सांगून वीज ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सरकार करित आहे. ऊर्जामंत्र्यांना अधिकार आहेत, मुख्यमंत्र्यांशी बोलून ते वीज बिल कमी करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. पण जबाबदारी झटकण्याचे काम उर्जामंत्री करित आहेत, अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *