कोल्हापूरचा जवान काश्मीरमध्ये शहीद!
कोल्हापूरचा जवान काश्मीरमध्ये शहीद!
निगवे खालसा गावातील संग्राम पाटील यांना वीरमरण.
कोल्हापूर, दि. 21 नोव्हेंबर:
जम्मू काश्मीर मधील राजौरी जिल्ह्यातील नोशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान संग्राम शिवाजी पाटील शहीद झाले.
शहीद जवान संग्राम पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा गावातील रहिवाशी असून, अठरा वर्षांपूर्वी ते लष्करात दाखल झाले होते. सैन्यदलातील ‘१६ मराठा बटालियन’मध्ये ते कार्यरत होते. संग्राम यांची १७ वर्ष सेवेची मुदत गेल्या वर्षी संपली होती. त्यानंतर त्यांनी दोन वर्ष मुदत वाढवून घेतली होती.
मागील आठवड्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील ॠषीकेश जोंधळे यांना सीमेवर वीरमरण आले. महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवान शहिद झाल्याने हळहळ व्यक्त आहे.
