मुंबई दिल्ली विमान-रेल्वे बंद करणार ?

0
20201120_182144

मुंबई दिल्ली विमान रेल्वे बंद करणार ?

वाढत्या कोरोनामुळे सरकारचा विचार .

मुंबई, दि.20 नोव्हेंबर:

कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसत असतानाच पुन्हा कोरोना रुग्ण वाढत आहेत. दिल्लीत करोनाची लाट आली असून कोरोना झपाट्याने पसरत आहे. दिल्लीपाठोपाठ मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.

मुंबईतसह राज्यातही दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकार मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे.

दसरा, दिवाळी निमित्त लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले, त्यामुळे रुग्ण संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

23 नोव्हेंबर पासून राज्यातील शाळा सुरु करण्याचे आदेश दिले होते पण आता मुंबईतील शाळा डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्लीत मागील २४ तासात तब्बल ७ हजार ५०० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. २८ ऑक्टोबरपासून दिल्लीत रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिल्लीत सुरूवातीला एकाच दिवसात ५००० हजार रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर ११ नोव्हेंबरपर्यंत २४ तासात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येनं ८ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *