सावळें सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयीं माझे!

0
20201116_090802

दिवाळीनिमित्त पंढरीच्या विठोबाला फुलांची आरास.

पंढरपूर, दि. 16 नोव्हेंबर:
दिवाळी पाडव्याच्या व भाऊबिजेच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणीला फुलांची आरास करून सजवण्यात आले आहे.

मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात रंगबेरगी फुलाची सुंदर व मनमोहक सजावट करण्यात आली आहे.

विठोबाचे सावळे सुंदर रूप सदा आपल्या हृदयात राहू दे आणि त्याचे गोड नामस्मरण घडत राहू दे एवढीच आपली एकमेव इच्छा आहे, असे संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात सांगितले आहे.

सावळें सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥
आणिक कांही इच्छा, आम्हां नाहीं चाड ।
तुझें नाम गोड, पांडुरंगा ॥२॥
जन्मोजन्मीं ऐसें, मागितलें तुज ।
आम्हांसी सहज, द्यावें आतां ॥३॥
तुका म्हणे तुज, ऐसे दयाळ ।
धुंडितां सकळ, नाहीं आम्हां ॥४॥

आजची सजावट दिघी पुणे येथील भाविक संतोष तानाजी वाळके यांच्यातर्फे आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *