Ads

--

नितीशकुमारच बिहारचे मुख्यमंत्री..

By Xtralarge News

November 15, 2020 8:25 pm

Ads

बिहारचे सातवे मुख्यमंत्री नितीशकुमार, सोमवारी शपथविधी…

पाटणा, दि. 15 नोव्हेंबर:

नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ते सोमवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. एनडीएच्या बैठकीत हा निर्णय झाला.

बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासंदर्भात भाजपा, जेडीयू, हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीची नितीश कुमार यांच्या निवासस्थानी आज बैठक पार पडली.

नितीश कुमार हे सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये रेल्वेमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने १२२ जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. भाजपाला ७४ तर जदयुने ४३ जागांवर विजय मिळवला.

या निवडणुकीत जदयुला मोठा फटका बसला परंतु निवडणुकीआधी नितीशकुमारच बिहारचे मुख्यमंत्री होतील असे भाजपाने जाहीर केले होते त्यानुसार भाजपाच्या जागा जास्त येऊनही भाजपाने शब्द पाळला आणि नितीशकुमार यांनाच एनडीएचा नेता निवडला.

 

 

No comments to show.

Leave a Comment