Ads

--

अर्णब गोस्वामी तुमचा कोण लागतो?

By Xtralarge News

November 13, 2020 11:59 am

Ads

अर्णब गोस्वामी तुमचा कोण लागतो ?

गुन्हेगारांना वाचवण्यासाठी भाजपाची फडफड…
शिवसेनेचा भाजपा व सोमय्यावर तुफानी हल्ला!

मुंबई, दि. 13 नोव्हेंबर:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबावर भाजपा नेते माजी खासदार किरीटच सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली आहे. मराठी भगिनीचे कुंकू पुसले त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात असताना शेठजीच्या पक्षाचे प्रवक्ते तपास भरकवटण्यासाठी फडफड करत आहेत असा घणाघात खा. संजय राऊत यांनी केला आहे.

सोमय्यांचा समाचार घेताना राऊत म्हणाले, ‘ आम्ही जेव्हा त्या अबलेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत तेव्हा तपास भरकटवण्यासाठी, तपासाची दिशा बदलण्यासाठी हे शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते असे फालतू मुद्दे घेऊन समोर येत आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. त्या बाईचं कुंकू पुसलं तरी चालेल….आणि कोणत्या जमिनीचे व्यवहार…कोण आहे हा माणूस? याला काय माहिती आहे. २०१४ सालचा एक कायदेशीर व्यवहार आहे. त्याच्यासाठी हातात कागद घेऊन गिधाडासारखा फडफडतोय.

राऊत पुढे म्हणाले, मराठी माणसाने केलेला व्यवहार यांच्या डोळ्यात खुपतोय का? म्हणे २१ व्यवहार केले. हा खोटारडेपणाचा कळस आहे. ही त्यांना वॉर्निंग आहे. त्यांनी अशी कितीही फडफड केली तरी महाराष्ट्राचं सरकार पाच वर्ष चालणार. आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय द्यायची आहे. गुन्हेगारांना शिक्षा देण्याची आहे. शेठजीच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना गुन्हेगारांना वाचवायचं आहे म्हणून अशी फडफड करत आहेत. त्यांनी कितीही फडफड केली तरी काही निष्पन्न होणार नाही.

एका गुन्हेगाराला भेटण्यासाठी तुम्ही तुरुंगात जाता, आंकांडतांडव करत आहात. कोण लागतो तो तुमचा? ती महिला तुमची कोणी लागत नाही? तिचा नवरा मेला आहे, सासू मेली आहे. ते तुमचे कोणीही लागत नाहीत. हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. हे ढोंगी, भंपक, खोटारडे, बनावट लोक आहेत, या शब्दात संजय राऊत यांनी सोमय्या आणि भाजपाला सुनावले.

 

No comments to show.

Leave a Comment