…तेव्हा सोमय्यांची बोबडी वळली होती का?

0
20201112_233630

….तेव्हा तुमची बोबडी वळली होती का?
किरीट सोमय्यांच्या आरोपांना अन्वय नाईकांच्या कुटुंबीयांचे उत्तर.

मुंबई, दि. 12 नोव्हेंबर :
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबातील व्यवहारावर गंभीर आरोप केल्यानंतर नाईक कुटुंबाने सोमय्या यांचा समाचार घेतला आहे. सोमय्या जे सातबारे दाखवत आहेत ती खुली कागदपत्रं असतात. महाभूमीच्या वेबसाईटवर गेलात तरी तुम्हाला ती मिळतील. त्यामुळे ही अशी खुली कागदपत्रं जाहीर केल्याबद्दल मी किरीट सोमय्यांचे आभार मानते, असे अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी म्हटले आहे.

आज्ञा नाईक पुढे म्हणातात, ‘जमिनीचा व्यवहाराचा आत्महत्येच्या प्रकरणाशी काय संबंध आहे. किरीट सोमय्या नेमकं काय दाखवू इच्छित आहेत? राजकारण करायचं असेल तर ते काहीही मुद्दे आणू शकतात पण हे आत्ता आणण्यामागचं काय प्रयोजन आहे ? गुन्हेगार अर्णब गोस्वामीला पाठीशी का घालता ?,” अशी विचारणा आज्ञा नाईक यांनी केली आहे.

अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी ५ मे २०१८ ला जेव्हा आम्ही अग्नी दिला तेव्हा किरीट सोमय्या कुठे गेले होते? त्यांची बोबडी वळली होती का? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.

माझ्या घरातील दोन माणसं गेली आहेत. किरीट सोमय्यांनी जमिनीच्या व्यवहाराशी त्याची तुलना करु नये. एक आई आणि तिचा मुलगा गेला आहे. त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नका. बोबडी वळली आहे, आवाज बंद होण्यास वेळ लागणार नाही,” असा इशारा अक्षता नाईक यांनी यावेळी किरीट सोमय्या यांना दिला आहे.

रश्मी उद्धव ठाकरे आणि रविंद्र वायकर यांच्या पत्नीच्या नावे अन्वय नाईक कुटुंबांचे जमीन खरेदीचे 21 व्यवहार झाल्याचे आरोप किरीट सोमय्या यांनी केला. अन्वय नाईक कुटुंबासोबत उद्धव ठाकरे यांचे काय संबंध आहेत हे जाहीर करावे अशी मागणीही सोमय्या यांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *