Ads

-

अर्णव गोस्वामींची रवानगी तळोजा जेलमध्ये!

By Xtralarge News

November 8, 2020 3:42 pm

Ads

अर्णव गोस्वामींची रवानगी तळोजा जेलमध्ये !
मुंबई, दि. 8 नोव्हेंबर:

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांची रवानगी आता तळोजा जेलमध्ये करण्यात आली आहे. अर्णबसह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांनाही तळोजा जेलमध्ये हलवण्यात आले आहे. या तिघांना चार दिवसांपासून अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाइन सेंटर मध्ये ठेवण्यात आलं होतं.

क्वारंटाइन सेंटरमध्ये अटकेत असतानाही अर्णब मोबाईल वापरत असल्याचे निदर्शनास आले. अटक केल्यानंतर त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना तळोजाला हरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अलिबाग येथील कारागृह सुरक्षित नसल्याने त्यांना तळोजा जेलमध्ये हलवण्याची परवानगी न्यायालयाकडे मागण्यात आली होती. कारागृह महानिरीक्षकांची परवानगी घेऊन अर्णबसह तिन्ही आरोपींना तळोजा जेलमध्ये हलवण्यात आले..

अर्णब गोस्वामी यांच्या तातडीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय सोमवारी सुनावणी होणार आहे. उद्याही जामीन मिळाला नाही तर अर्णबची दिवाळी जेलमध्येच होईल.

 

 

No comments to show.

Leave a Comment