सर्व खबरदारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरु करा.

0
20201107_211833

खबरदारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरु कराव्यात.

करोना प्रादुर्भाव होऊ नये याची खबरदारी घेणं आवश्यक.

मुंबई, दि. 7 नोव्हेंबर:

कोरोना मुळे बंद असलेल्या शाळा सुरू होण्याचे निश्चित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेऊन नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत.

व्हिडीओ काॅन्फरंसिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यामंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आदि उपस्थित होते. जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारतां येत नाही. दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.

ज्या शाळांमध्ये क्वारंटाइन सेंटर्स तयार करण्यात आले होते ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत.अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का त्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. शाळांचे सॅनिटायझेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी या सारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. जी मुलं आजारी आहेत किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी १७ ते २२ नोव्हेंबर या दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. २३ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या शाळांमधे विद्यार्थ्यांचे थर्मल चेकींग करण्यात येईल. एका बेंचवर एक विद्यार्थी बसविण्यात येईल. एक दिवसाआड वर्ग भरतील, विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावे, स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी. चार तासांची शाळा राहील त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठीण विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाइन वर्गांची सुविधा असेल.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *