अर्णबना हाय कोर्टाचा दणका, जामीन नाहीच!

0
20201107_185244

अर्णबना हाय कोर्टाचा दणका, जामीन नाहीच !

अर्णबना अलिबाग सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देश..

मुंबई , दि. 7 नोव्हेंबर :
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना मुंबई हाय कोर्टातने मोठा झटका देत जामीन याचिकेवर अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. आज अर्णब यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. पण गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. जामिनासाठी सेशन कोर्टात अर्ज करा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

अर्णव गोस्वामी यांच्या अर्जावर आज हाय कोर्टात सकाळपासून युक्तीवाद सुरु होता. मात्र, हाय कोर्टाने जामीन फेटाळला. हाय कोर्टाच्या या आदेशामुळे अर्णव यांना जेलमधील मुक्काम वाढला आहे. आता पुढील सुनावणी सोमवारी 9 नोव्हेंबरला होणार आहे.

अलिबागचे मराठी उद्योगपती अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णव गोस्वामी यांना 4 नोव्हेंबरला अटक करण्यात आली. यानंतर अलिबाग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

अर्णव गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींना अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत ठेवलं गेलं आहे. अलिबागमधील ही शाळा आरोपींसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून करण्यात आली आहे. या शाळेतच त्यांना ठेवण्यात आले आहे.

अर्णव गोस्वामी यांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी अलिबाग पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका केली आहे. या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबतची  सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *