20201105_205045

दिल्लीत करोनाची साथ तीव्र..

नवी दिल्ली, दि. ६ नोव्हेंबर:
कोरोनाचे संकट कमी होण्याऐवजी वाढत असून तिसऱ्या लाटेचा अनुभव घेणाऱ्या दिल्लीमध्ये गुरुवारी ६ हजार ८४२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. दिवाळीमुळे बाजार पेठांमध्ये खरेदीची लोकांची झुंबड उडाल्यामुळे कोरोनाची पुन्हा साथ आली आहे. काही दिवसांत दैनंदिन रुग्णांचा आकडा १५ हजारांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गुरुवारी दिल्लीत करोनामुळे ५१ जणांचा मृत्यू झाला. दिल्लीतील मोठ्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या वाढवावी लागेल. वेळप्रसंगी करोनाची साथ रोखण्यासाठी पुन्हा मर्यादित लॉकडाउन करावे लागेल, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दिल्लीत दररोज ६ हजार किंवा त्यापेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद केली जात आहे. आतापर्यंत ४ लाख ९ हजार ९३८ करोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून ३७ हजार ३६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीत आतापर्यंत ३ लाख ६५ हजार ८६६ रुग्ण करोनामुक्त झाले असून ६ हजार ७०३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *